Events
‘रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलन’ –
मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई व नवनिर्माण शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलनाचे’ औचित्य साधून युवकांसाठी स्वलिखीत काव्य वाचन आणि निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये आपल्या श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या श्री. आनंदराव पवार महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. वेदिका विष्णू हरवडे हिने युवारंग स्वलिखित काव्य वाचन स्पर्धेत १६ ते ३५ वर्षे वयोगटतून व्दितीय क्रमांक प्राप्त केलेला आहे तसेच कनिष्ठ महाविद्यालयीन गटातून निबंध स्पर्धेत कु. वैष्णवी गजानन हळदे हिने सुध्दा प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे.
संविधान दिन (दि. २६/११/२०२५)
श्रीराम एज्युकेशन सोसायटी श्री.आनंदराव पवार महाविद्यालयामध्ये दिनांक 26 /11 /2025 रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला.
रत्नागिरी जिल्हास्तरीय युवा महोत्सव स्पर्धा – २०२५ (दि. २०/११/२०२५)
दि. २० नोव्हेंबर २०२५ रोजी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी आयोजित “रत्नागिरी जिल्हास्तरीय युवा महोत्सव स्पर्धा – २०२५” मध्ये जिल्हा क्रीडा संकुल, मारुती मंदिर रत्नागिरी येथे झालेल्या वत्कृत्व आणि कथालेखन स्पर्धेत श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या श्री. आनंदराव पवार महाविद्यालयाची इ. ११ वी सायन्स मधील विद्यार्थीनी कु. वेदिका विष्णू हरवडे हिला वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त झालेला आहे तसेच कु. वैष्णवी गजानन हळदे हीला सुध्दा कथालेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त झालेला आहे.
मुंबई विद्यापीठ संघात निवड
श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या श्री. आनंदराव पवार महाविद्यालयाचा कु. स्वराज संदीप जोशी “मुंबई विद्यापीठ इंटर झोन अॅथलेटिक्स अजिंक्यपद २०२५-२६” मध्ये १५०० मीटर धावणे स्पर्धेत द्वितीय क्रमांक (सिल्व्हर मेडल) पटकावला आहे. त्याची मुंबई विद्यापीठ संघात निवड झाली.
रत्नागिरी जिल्हा संघामध्ये निवड
रविवार दिनांक १६ नोव्हेंबर २०२५ रोजी ओणी ता. राजापूर येथे झालेल्या रत्नागिरी जिल्हा खो-खो कुमार अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेमध्ये श्रीराम एज्युकेशन सोसायटी स्पोर्टस् अकॅडमी चिपळूण आणि श्री. आनंदराव पवार महाविद्यालय, चिपळूणचा विद्यार्थी कु. विराज निलेश निवाते (इयत्ता १२ वी) यांनी चमकदार कामगिरी करुन रत्नागिरी जिल्हा संघामध्ये स्थान प्राप्त केले आहे.
सामूहिक वंदे मातरम या गीताचे गायन (दि. ०७/११/२०२५)
श्रीराम एज्युकेशन सोसायटी श्री. आनंदराव पवार महाविद्यालय मध्ये दिनांक 7 नोव्हेंबर 2025 रोजी वंदे मातरम या सार्थ शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या रचनेला 150 वर्ष पूर्ण होत आहेत या ऐतिहासिक घटनेची औचित्य साधून सामूहिक वंदे मातरम या गीताचे गायन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
कु. यश मंगेश शिर्के “मुंबई विद्यापीठ इंटर कॉलेजिएट अॅथलेटिक्स अजिंक्यपद २०२५ – कोकण विभाग IV” १० की.मी. धावणे स्पर्धेत प्रथम
३१ ऑक्टोबर ते ०२ नोव्हेंबर २०२५ दरम्यान एस. व्ही. जे. सी. टी. क्रीडा संकुल, डेरवण ता. चिपळूण येथे चालू असलेल्या “मुंबई विद्यापीठ इंटर कॉलेजिएट अॅथलेटिक्स अजिंक्यपद २०२५ – कोकण विभाग IV” मुलांमध्ये आज झालेल्या १० की.मी. धावणे या क्रीडा प्रकारात कु. यश मंगेश शिर्के याने प्रथम क्रमांक (गोल्ड मेडल) पटकावला आहे. त्याची इंटर झोन स्पर्धेसाठी निवड
राष्ट्रीय एकता दिवस (दि. ३१/१०/२०२५)
श्रीराम एज्युकेशन सोसायटी श्री आनंदराव पवार महाविद्यालय मध्ये शुक्रवार दि. 31 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 :30 वाजता सरदार वल्लभभाई पटेल यांचे 150 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय सेवा योजना (NSS)अंतर्गत राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला.त्यावेळी पदयात्रा व राष्ट्रीय एकता दिवस शपथ यांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे पीआरओ श्री. योगेश चौगुले सर, संस्थेचे रजिस्टर श्री. अजित खेडेकर सर तसेच एन.एस.एस.कार्यक्रम अधिकारी श्री. विक्रांत निवाते सर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
भारतरत्न डॉक्टर ए.पी.जे अब्दुल कलाम जयंती व वाचन प्रेरणा दिन (दि. १५/१०/२०२५)
श्रीराम एज्युकेशन सोसायटी श्री.आनंदराव पवार महाविद्यालय मध्ये दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ रोजी भारतरत्न डॉक्टर ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाच्या प्राध्यापिका सौ. आरोही जाधव यांनी केले. श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आनंदराव पवार महाविद्यालयाचे चेअरमन श्री.मल्लेश लकेश्री सर तसेच कार्यवाहक श्री.प्रशांत देवळेकर सर कोषाध्यक्ष श्री.सिद्धेश लाड सर तसेच संस्थेचे पी.आर.ओ. श्री.योगेश चोगले सर आणि महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ.अरुणा सोमण मॅडम यांनी दीप प्रज्वलन आणि प्रतिमेस पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी महाविद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महाविद्यालयाच्या प्राध्यापिका सौ . आरोही जाधव यांनी केले.अशा पद्धतीने महाविद्यालयामध्ये भारतरत्न डॉक्टर ए.पी.जे अब्दुल कलाम व वाचन प्रेरणा दिन ही साजरा केला गेला.
श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या श्री. आनंदराव पवार महाविद्यालयाचा कु. निलेश शिंदे याची ऑल इंडिया कबड्डी स्पर्धेत निवड
०१ ते ०५ ऑक्टोबर २०२५ दरम्यान मेडिकॅप्स विद्यापीठ, ए.बी. रोड, पिगडंबर, राऊ, इंदौर येथे झालेल्या पश्चिम विभागीय आंतर- विद्यापीठ कबड्डी (पुरुष) स्पर्धेत कु. निलेश रविंद्र शिंदे याने मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले त्यात या संघाला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. त्यामुळे त्यांची ऑल इंडिया कबड्डी स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. यामुळे त्यांची गलगोटिया विद्यापीठ, ग्रेटर नोएडा, दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ कबड्डी (पुरुष) स्पर्धेत निवड करण्यात आली.
कु. वेदिका विष्णू हरवडे हिला तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त (दि. ०२/१०/२०२५)
श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या श्री. आनंदराव पवार महाविद्यालयाची कु. वेदिका विष्णू हरवडे हीने वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून सुयश प्राप्त केले आहे. सदर स्पर्धा लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, चिपळूण यांच्या वतीने आयोजित केली होती. त्यामध्ये महाविद्यालयीन गटातून कु. वेदिका विष्णू हरवडे हीने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
जिल्हास्तरीय वक्तृत्व व निबंध स्पर्धेत सुयश – कु. वेदिका विष्णू हरवडे वक्तृत्व स्पर्धेत तृतीय तर वैष्णवी हळदे निबंध स्पर्धेत उत्तेजनार्थ (दि. ०२/१०/२०२५)
चिपळूण नगर परिषद चिपळूण आणि पूज्य गांधी प्रतिष्ठान चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय वक्तृत्व आणि निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, या स्पर्धेत जिल्ह्यातून अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये कनिष्ठ महाविद्यालयीन गटातून श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या श्री. आनंदराव पवार महाविद्यालयाची कु. वेदिका विष्णू हरवडे हिने वक्तृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त केला तर कु. वैष्णवी गजानन हळदे हिने निबंध स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांक मिळवून सुयश प्राप्त केले आहे. या दोघींना आज दि. ०२ ऑक्टोबर रोजी (म. गांधी जयंती जयंती) सकाळी ठीक ०९ वाजता गांधारेश्वर मंदिर शेजारी म. गांधी रक्षाकलश समोर मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस देवून गौरविण्यात आले.
महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती (दि. ०२/१०/२०२५)
श्रीराम एज्युकेशन सोसायटी श्री आनंदराव पवार महाविद्यालय मध्ये दिनांक 2 ऑक्टोबर २०२५ रोजी महात्मा गांधी व मा माजी प्रंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाच्या प्राध्यापक सौ. राधिका वर्पे यांनी केले. संस्थेचे रजिस्टार श्री अजित खेडेकर सर आणि महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ अरुणा सोमण मॅडम यांनी दीप प्रज्वलन आणि प्रतिमेस पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी यावेळी महाविद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेचे रजिस्टर श्री खेडेकर सर यांनी महात्मा गांधीजींबद्दल आणि लालबहादुर शास्त्री यांच्या बद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महाविद्यालयाच्या प्राध्यापिका सौ राधिका वर्पे यांनी केले.अशा पद्धतीने महाविद्यालयामध्ये महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली.
स्वच्छता मोहीम (दि. २४/०९/२०२५)
श्री.आनंदराव पवार महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित ‘स्वच्छता ही सेवा मोहीम 2025′(SHS)अंतर्गत एक दिवस, एक तास, एक साथ स्वच्छता म्हणून राबविण्यात आले.यावेळी महाविद्यालयाच्या परिसरात स्वच्छता करण्यात आले.यावेळी स्वच्छता ही सेवा यावर जनजागृती करण्यात आली.
यावेळी संस्थेचे पी.आर.ओ. श्री.योगेश चौगुले सर, रजिस्टार श्री.अजित खेडेकर सर, महाविद्यालयाच्या प्राचार्य सौ.अरुणा सोमन मॅडम यांच्या विशेष मार्ग दर्शनाखाली उपरोक्त कार्यक्रमाचे प्रयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रम अधिकारी श्री.विक्रांत निवाते सर तसेच सर्व प्राध्यापक वर्ग,व एनएसएस स्वयंसेवक उपस्थित होते.
कोकण झोन कबड्डी
२२ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर २०२५ दरम्यान डी.ए.व्ही. कॉलेज भांडुप आयोजित मरीन लाईन मुंबई येथे झालेल्या आंतर कबड्डी स्पर्धेत कोकण झोन कबड्डी मुलांच्या संघाने दुसरे आणि मुलींच्या कबड्डी संघाने तिसरे स्थान पटकावले आहे…. त्यामध्ये सहभागी विद्यार्थी कु. अमरसिंग कश्यप (कॅप्टन), कु. ओम शिर्के, कु. निलेश शिंदे, कु. रोशन चिपळूणकर, कु. प्राची बाधवणकर
महाविद्यालयाची कु. वेदिका विष्णू हरवडे हिला रोटरी क्लब ऑफ चिपळूण आयोजित आंतरविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त (दि. २०/०९/२०२५)
श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या श्री. आनंदराव पवार महाविद्यालयाची कु. वेदिका विष्णू हरवडे हीने रोटरी क्लब ऑफ चिपळूण आयोजित आंतरविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत (ग्रुप – क : ११ वी ते १२ वी) कनिष्ठ महाविद्यालयीन गटातून तृतीय क्रमांक मिळवून सुयश प्राप्त केले आहे. वेदिकाला मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र, सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात आले. सदर स्पर्धा आज दि. २० सप्टेंबर २०२५ रोजी एस.पी.एम. इंग्लिश मिडीयम स्कूल परशुराम, ता. चिपळूण येथे संपन्न झाली.
महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींचा जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक (दि. १९/०९/२०२५)
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय रत्नागिरी आयोजित जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये कबड्डी (१९ वर्षा खालील मुली) या क्रीडा प्रकारात आपल्या श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या श्री. आनंदराव पवार महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींनी (चिपळूण) फायनल मध्ये प्रवेश करुन गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (रत्नागिरी) विरुद्ध झालेल्या अटीतटीच्या सामन्यात प्रथम क्रमांक (विजेतेपद) प्राप्त केले आहे.
आरोग्य तपासणी (हिमोग्लोबिन) (दि. १५/०९/२०२५)
श्रीराम एज्युकेशन सोसायटी श्री.आनंदराव पवार महाविद्यालय चिपळूण येथे एनएसएस विभागातर्फे श्रमिक कृषी संवर्धन संस्था आणि स्वयंपूर्णता फाउंडेशन रत्नागिरी श्रीमद राजचंद्र हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर (SRHRC) धरमपूर, गुजरात यांच्या संयुक्त विद्यमाने अनिमिया नियंत्रण प्रकल्प, आरोग्य तपासणी (हिमोग्लोबिन ) दिनांक 15 /09 /2025 रोजी श्री.आनंदराव पवार महाविद्यालय मध्ये राबवण्यात आले.
कोकण विभागातील स्त्री पुरुष व मुला मुलींमधील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्याने त्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. कुपोषण व अशक्तपणा जास्त प्रमाणात असल्याने संपूर्ण आरोग्यावर, शारीरिक व मानसिक क्षमता यावर हिमोग्लोबिनचा परिणाम होत आहे.
त्या अनुषंगाने हा उपक्रम आपल्या श्रीराम एज्युकेशन सोसायटी श्री.आनंदराव पवार महाविद्यालय मध्ये राबविण्यात आला. त्यावेळी श्रमिक कृषी संवर्धन संस्थेचे अध्यक्ष श्री विलास डिके सर, तसेच संस्थेचे पीआरओ श्री. योगेश चौगुले सर, रजिस्टार श्री. अजित खेडेकर सर महाविद्यालयाच्या प्राचार्य सौ. अरुणा सोमन मॅडम,एनएसएस प्रमुख श्री.विक्रांत निवाते सर, तसेच महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
आरोग्य तपासणी शिबिर व सामान्य मानसिक आरोग्य कार्यशाळा सेमिनार (दिनांक: ०९ /०९ /२०२५)
श्री. आनंदराव पवार महाविद्यालयांमध्ये दिनांक 09/09/2025 आरोग्य तपासणी शिबिर व सामान्य मानसिक आरोग्य कार्यशाळा सेमिनार घेण्यात घेण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते आदरणीय अनुपमा पांडे व वानखेडे यांना आमंत्रित करण्यात आले होते.मानसिक आरोग्य ही प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. शारीरिक आरोग्याइतकेच मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर मानसिक आरोग्याविषयी योग्य माहिती, तणाव व्यवस्थापन, भावनिक संतुलन आणि सकारात्मक विचारसरणी विकसित व्हावी यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली. मानसिक आरोग्य चांगले असणे ही काळाची गरज आहे.
तसेच विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. डॉ. कीर्ती जोशी आणि त्यांची सहकारी फिजा गोलंदाज यांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य विषयी जागरूकता निर्माण करणे तसेच विविध आजारांचे वेळेत निदान व्हावे हे मुख्य उद्दिष्ट होते.
रत्नागिरी जिल्हा ज्युनियर ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ आणि रत्नागिरी जिल्हा अंडर २३ ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप (दि. २४/०८/२०२५)
रत्नागिरी जिल्हा ज्युनियर ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ आणि रत्नागिरी जिल्हा अंडर २३ ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप ही स्पर्धा S.V.J.C.T. स्पोर्ट्स अकॅडमी, डेरवण येथे रविवार दि. २४ ऑगस्ट २०२५ रोजी आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये २० वर्षाखालील गटात ओम पवार याला १०० मीटर द्वितीय क्रमांक आणि ४०० मीटर द्वितीय क्रमांक प्राप्त तसेच १८ वर्षाखालील गटात विराज निवाते याला ४०० मीटर चतुर्थ क्रमांक प्राप्त ३९ वी महाराष्ट्र राज्य ज्युनियर ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ पुणे येथे २ ते ५ सप्टेंबर २०२५ दरम्यान होणार आहे. त्यासाठी ओम पवार याची निवड झाली आहे.
आझादी का अमृत महोत्सव (दि. १३ ते १५/०८/२०२५)
श्री. आनंदराव पवार महाविद्यालयात १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत आझादी का अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमाचा प्रमुख उद्देश विद्यार्थ्यांमध्ये स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून देणे तसेच स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाची जाणीव करून देणे हा होता.
१३ ऑगस्ट रोजी कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेच्या कार्याध्यक्ष सौ सई वरवटकर मॅडम यांच्या हस्ते झाला त्यावेळी संस्थेचे पदाधिकारी संस्थेचे संचालक बांधकाम समिती प्रमुख श्री सुहास चव्हाण सर PRO श्री योगेश चौगुले सर रजिस्टार श्री अजित खेडेकर सर महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ अरुणा सोमण मॅडम शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. उद्घाटनावेळी प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या दिवशी देशभक्तीपर व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
१४ ऑगस्ट रोजी श्री आनंदराव पवार महाविद्यालयांमध्ये संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा कॉलेज कमिटी अध्यक्ष श्री मल्लेश लकेश्री सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.तसेच संचालक बांधकाम समिती प्रमुख श्री सुहास चव्हाण सर PRO श्री योगेश चौगुले सर रजिस्टार श्री अजित खेडेकर सर परांजपे मोतीवाले हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री भाऊ कांबळे सर,महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ अरुणा सोमण मॅडम शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. महाविद्यालयातर्फे भव्य दिव्य रॅलीचं आयोजन करण्यात आले.या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी घोषवाक्ये देत सामाजिक संदेश देणारे फलक हातात घेऊन मोठ्या उत्साहाने भाग घेतला. रॅलीतून स्वच्छता, सामाजिक जबाबदारी व राष्ट्रीय एकात्मतेचे संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आले.
१५ ऑगस्ट रोजी श्री आनंदराव पवार महाविद्यालयात भारताचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी ठीक सात वाजता सर्व मान्यवर शिक्षक व विद्यार्थी महाविद्यालयाच्या प्रांगणात एकत्र जमले. या दिवशी ध्वजारोहण संस्थेच्या उपाध्यक्ष श्रीमती कुंदा बापूसाहेब खेडेकर मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे पदाधिकारी अध्यक्ष श्री उदय गांधी सर तसेच उपाध्यक्ष श्री उल्हास पवार सर विश्वस्थ डॉक्टर मीनल ओक कार्यवाहक श्री प्रशांत देवळेकर सर कोषाध्यक्ष श्री सिद्धेश लाड सर तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच कॉलेज कमिटी अध्यक्ष श्री मल्लेश लके श्री सर PRO श्री योगेश चौगुले सर रजिस्टार श्री अजित खेडेकर सर परांजपे मोतीवाले हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री भाऊ कांबळे सर,महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ अरुणा सोमण मॅडम शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी संस्थेच्या उपाध्यक्ष श्रीमती कुंदा बापूसाहेब खेडेकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना आपल्या भाषणातून स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची आठवण करून दिली आणि विद्यार्थ्यांना राष्ट्रनिर्मितीत सक्रिय योगदान देण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, नाटिका, नृत्य इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून वातावरण देशभक्तीमय केले.
संपूर्ण कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शिक्षकवृंद, आयोजन समिती आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. शेवटी आभारप्रदर्शनाने कार्यक्रमाचा समारोप झाला.
एस आर रंगनाथन जयंती (दि. १२ ऑगस्ट, २०२५)
क्रांती दिन (दि. ०९/०८/२०२५)
श्रीराम एज्युकेशन सोसायटी श्री आनंदराव पवार महाविद्यालयामध्ये दिनांक 9 ऑगस्ट 2025 रोजी क्रांती दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलाने करण्यात आली. यावेळी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा कॉलेज कमिटी अध्यक्ष श्री मल्लेश लकेश्री सर तसेच संस्थेचे पी आर ओ श्री योगेश चौगुले सर आणि रजिस्टार श्री अजित खेडेकर सर आणि महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ.अरुणा सोमन मॅडम उपस्थित होते तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते श्री मल्लेश लकेश्री सर यांनी क्रांती दिना निमित्त आपले मनोगत व्यक्त केले व विद्यार्थ्यांना क्रांती दिनाचे महत्त्व समजावून सांगितले.
श्रीराम पावसाळी महोत्सव स्पर्धा व नवगतांचे स्वागत (२१ जुलै, २०२५)
श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे श्री.आनंदराव पवार महाविद्यालय खेंड चिपळूण दिनांक 21 जुलै 2025 रोजी श्रीराम पावसाळी महोत्सव स्पर्धेला उत्साहात प्रारंभ करण्यात आला. या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे कार्यवाह श्री. प्रशांत देवळेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष उदय गांधी, कॉलेज कमिटी अध्यक्ष मल्लेश लकेश्री, कोषाध्यक्ष श्री.सिद्धेश लाड, कार्यवाह श्री. प्रशांत देवळेकर, संचालक श्री. सुहास चव्हाण, तसेच संस्थेचे पीआरओ श्री.योगेश चौगुले रजिस्टार श्री. अजित खेडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य सौ.अरुणा सोमन व युवा सेना प्रमुख श्री. निहार कोवळे यांचे क्रीडा विद्यार्थी प्रतिनिधी तर्फे स्वागत करण्यात आले. तसेच रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आले. व नवगत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन एनएसएस विभाग,स्पोर्ट्स विभाग,आणि सांस्कृतिक विभाग यांनी केले होते.
गुरु पौर्णिमा (१०/०७/२०२५)
श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे, श्री. आनंदराव पवार महाविद्यालयात गुरु पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थी गुरुराज धीरज जंगम याने सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे सर्व नियोजन एन एस.एस विभागाकडून करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते आशिष सर मोकादम यांना आमंत्रित करण्यात आले होते
