Events

A

दि.१७/०३/२०२६ रोजी करियर कट्टा अंतर्गत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन याविषयी मेडिकलचे विद्यार्थी ओम मल्लेश लकेश्री यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले

A

दि. १८ जानेवारी २०२६ रोजी मार्गताम्हाने एज्युकेशन सोसायटी मार्गताम्हाने, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी आयोजित “प्रत्येक श्वास मातृभूमीसाठी, एक धाव देशासाठी भव्य मॅरेथॉन स्पर्धा – २०२६” मध्ये श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे, श्री. आनंदराव पवार महाविद्यालयाच्या कु. स्वराज संदिप जोशी याने प्रथम क्रमांक तर कु. ओंकार अनंत चांदीवडे यांने तृतीय क्रमांक प्राप्त केला, त्यांना उपस्थित संस्थेचे चेअरमन श्री. मधुकरराव चव्हाण आणि मान्यवरांचा हस्ते सन्मानपत्र आणि रोख रक्कम पारितोषिक देवून गौरविण्यात आले.

A

श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या श्री. आनंदराव पवार महाविद्यालयाचा कु. स्वराज संदिप जोशी “मुंबई विद्यापीठ इंटर कॉलेजिएट क्रॉस कंट्री अजिंक्यपद २०२५ – कोकण विभाग” १० की.मी. धावणे स्पर्धेत  प्रथम

०७ जानेवारी २०२६ रोजी डी. जी. तटकरे कला आणि वाणिज्य कॉलेज, तळा, जि. रायगड, येथे “मुंबई विद्यापीठ इंटर कॉलेजिएट क्रॉस कंट्री अजिंक्यपद २०२५ – कोकण विभाग” पुरुष गटामध्ये झालेल्या १० की.मी. धावणे या क्रीडा प्रकारात कु. स्वराज संदिप जोशी याने प्रथम क्रमांक (गोल्ड मेडल) पटकावला आहे. तसेच त्याची इंटर झोन स्पर्धेसाठी निवड

A

श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या श्री. आनंदराव पवार महाविद्यालयाचा कु. रुद्र बाबू जंगम “मुंबई विद्यापीठ इंटर कॉलेजिएट तायक्वांदो अजिंक्यपद २०२५-२६” स्पर्धेत  व्दितीय

दि. ०३ जानेवारी २०२६ रोजी तात्यासाहेब नातू महाविद्यालय, मार्गताम्हाणे ता.  चिपळूण  येथे झालेल्या “मुंबई विद्यापीठ इंटर कॉलेजिएट तायक्वांदो अजिंक्यपद २०२५-२६” (वजनी गट ७४ ते ८०) मधून कु. रुद्र बाबू जंगम याने व्दितीय क्रमांक (सिल्व्हर मेडल) मिळवला आहे. त्याचे मुंबई विद्यापीठाचे कोकण विभाग समन्वयक शशांक उपशेट्ये यांच्या हस्ते मेडल देवून गौरविण्यात आले. श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे सर्व वरीष्ठ पदाधिकारी, पी.आर.ओ., रजिस्ट्रार, महाविद्यालयाच्या प्राचार्या, प्राचार्य, क्रीडा मार्गदर्शक, सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावतीने रुद्रचे खूप-खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा

A

सावित्रीबाई फुले यांची जयंती (दि. ३ जानेवारी २०२६)

श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या श्री आनंदराव पवार महाविद्यालय खेंड येथे श्री. सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ अरुणा सोमण मॅडम उपस्थित होत्या. प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सौ राधिका वर्पे मॅडम यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ अरुणा सोमण मॅडम यांचे पुष्प देऊन स्वागत केले.

११ वी आर्ट्स व कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी ओवी सादर केली. तसेच ११ वी सायन्स व कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सिनियर कॉलेजचे प्राध्यापक श्री. मर्गज सर यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच सौ अरुणा सोमण मॅडम यांनीही मुलांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ शिरोळे मॅडम यांनी केले. या कार्यक्रमासाठी ज्युनियर आणि सिनियर महाविद्यालयाच्या सर्व स्टाफ तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

A

श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे श्री. आनंदराव पवार महाविद्यायाची कु. वेदिका विष्णू हरवडे हीचा गुरुकुल कॉलेज, चिपळूण आयोजित “शोध कलागुणांचा २०२६ इंटर कॉलेजिएट फेस्ट” मधील पी.पी.टी. स्पर्धेत तृतीय क्रमांक (दि. ०२ जानेवारी २०२६)

दि. ०२ जानेवारी २०२६ रोजी गुरुकुल कॉलेज, खेर्डी, ता. चिपळूण यांच्या वतीने आयोजित केलेल्या “शोध कलागुणांचा २०२६ इंटर कॉलेजिएट फेस्ट” स्पर्धेत आपल्या श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या श्री. आनंदराव पवार महाविद्यालयाची इ. ११ वी विज्ञान शाखेतील कु. वेदिका विष्णू हरवडे या विद्यार्थिनीने कनिष्ठ आणि वरीष्ठ महाविद्यालयीन या एकत्रित गटातून पी.पी.टी. प्रेझेंटेशन या स्पर्धा प्रकारात ‘E-business’ या विषयावर तृतीय क्रमांक प्राप्त केला असून तीला सन्मान चिन्ह आणि सन्मान पत्र देवून गौरविण्यात आले. संस्थेचे सर्व वरीष्ठ पदाधिकारी, पी.आर.ओ, रजिस्ट्रार, महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राचार्या, सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने वेदिकाचे खूप-खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.

A

आनंदराव पवार महाविद्यालयात अंतरंग महोत्सवाचे आयोजन (दि. २२ ते २४ डिसेंबर, २०२५)

श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे श्री आनंदराव पवार महाविद्यालयात श्रीराम महोत्सव अंतरंग 2025- 26 चे आयोजन करण्यात आले.  महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक उपक्रमा बरोबरच सांस्कृतिक उपक्रमांना विशेष महत्त्व दिले जाते. या कार्यक्रमाचे उद्घाटन कॉलेज  डेव्हलपमेंट कमिटीचे  सदस्य, नवनिर्वाचित नगरसेवक आदरणीय निहार कोवळे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलाने करण्यात आली. मान्यवर पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच नवनिर्वाचित नगरसेवक मा. निहार कोवळे यांचा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमार्फत वाढदिवस साजरा करण्यात आला. संस्थेच्या कार्याध्यक्षा सौ. सई वरवाटकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या व्यक्तिमत्त्वातील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी व स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी कॉलेज जीवनातील सर्व उपक्रमात सहभाग घेण्यास सांगितले. यावेळी परांजपे मोतीवाले हायस्कूल मधे इ. दहावीत प्रथम आलेली व विविध स्पर्धांमधून पारितोषिके मिळविणारी आनंदराव पवार कॉलेजची विद्यार्थिनी  कु.वेदिका हरवडे हिला  अष्टपैलू कामगिरी केल्याबद्दल  सौ. अस्मिता खातू (मुंबई) यांचेवतीने  रोख  बक्षीस देऊन तिचे कौतुक करण्यात आले.कार्यवाह श्री प्रशांत देवळेकर सर यांनी महाविद्यालयातील खेळाडूंचे तसेच विद्यार्थी वर्गाचे कार्यक्रमाच्या नियोजनाबद्दल विशेष अभिनंदन केले. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॉलेज कमिटीचे अध्यक्ष श्री मल्लेश लकेश्री सर यांनी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी परीक्षेच्या गुणांबरोबर त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळावा, त्याचबरोबर कॉलेजची मुलं उच्च पदावर पोहोचावेत याबाबत मुलांना प्रोत्साहन दिले. नवनिर्वाचित नगरसेवक निहार कोवळे यांनी महाविद्यालयातील मुलं  विविध स्पर्धांमधून जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर यश प्राप्त करत आहेत. याबद्दल विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले . कार्यक्रमाचे अध्यक्ष  श्री उदय शेठ गांधी यांनी  विद्यार्थ्यांमधील कलागुण, आत्मविश्वास, संघभावना व सर्जनशीलता विकसित करण्याचे उद्देशाने महाविद्यालयात श्रीराम महोत्सव अंतरंग 2025 -26 तीन दिवसीय (days) आयोजन करण्यात आले आहे त्याबद्दल सर्वांना शुभेच्छा दिल्या.

महाविद्यालयामध्ये ग्रुप सिमिलॅरिटी, ट्रॅडिशनल डे ,म्युझिकल चेअर अशा विविध कार्यक्रमाचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला. तसेच या कार्यक्रमासाठी अध्यक्ष उदय गांधी, उद्घाटक निहार कोवळे , कार्याध्यक्षा सई वरवाटकर मॅडम, संस्थेचे उपकार्याध्यक्ष राजन खेडेकर , कार्यवाह प्रशांत देवळेकर, बांधकाम समितीचे अध्यक्ष सुहास चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी, कॉलेज कमिटीचे अध्यक्ष मल्लेश  लकेश्री, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य डॉक्टर अरुण पाटील, परांजपे मोतीवाले हायस्कूलचे मुख्याध्यापक भाऊ कांबळे,  रजिस्ट्रार खेडेकर सर, पी.आर.ओ. चोगले सर , आनंदराव पवार महाविद्यालयाच्या प्राचार्या अरुणा सोमण , शिक्षक व इतर कर्मचारी यांनी विशेष उपस्थिती दाखवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थीनी कु. वैष्णवी  हळदे हिने केले.

A

श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या, श्री. आनंदराव पवार कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खेंड, ता. चिपळूणची कु. प्राची भादवणकर हीची २७ वी आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव २०२५ मध्ये कबड्डी महिला संघात चमकदार कामगिरी

दि. ०४/१२/२०२५ ते ०८/१२/२०२५ दरम्यान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे झालेल्या २७ वी महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव २०२५ (अश्वमेध क्रीडा स्पर्धा) मध्ये कबड्डी स्पर्धेत मुंबई विद्यापीठाचा महिला संघ अंतिम विजयी ठरला. महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या विद्यापीठ क्रीडा स्पर्धेमध्ये श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या, श्री. आनंदराव पवार महाविद्यालयाची कु. प्राची भादवणकर हिने मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करीत संघाकरीता उत्कृष्ट कामगिरी करुन अंतिम विजय मिळविण्यास योगदान दिले.

A

डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन (दि. ०६/१२/२०२५)

श्रीराम एज्युकेशन सोसायटी, श्री.आनंदराव पवार महाविद्यालय  खेंड चिपळूण येथे दि. ६ डिसेंबर २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे  रजिस्टार श्री. अजित खेडेकर तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्य सौ.अरुणा सोमण मॅडम व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

A

जागतिक एड्स दिन व पंधरवडा (दि. ०५/१२/२०२५)

श्रीराम एज्युकेशन सोसायटी, श्री. आनंदराव पवार महाविद्यालयांमध्ये दि. ०५/१२/२०२५ रोजी जागतिक एड्स दिन पंधरवडा निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना विभाग (एनएसएस) व रेड रिबन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात जनजागृती  फेरीचे आयोजन करण्यात आले. परिसरात काढलेल्या या फेरीदरम्यान विद्यार्थ्यांनी एड्स  जाणा -एड्स टाळा, मै जवान हु – नादान नही, ये हे मेरा वादा आज के दिन, एड्स की जानकारी खुशाल जिंदगी की सवारी,घरोघरी एकच नारा, एड्सला नाही थारा, करू एड्स निर्मूलन, उपाय एकच प्रतिबंधन, अशा प्रकारच्या घोषणा देऊन या भयंकर आजारापासून मुक्त राहण्याबाबत विद्यार्थी व ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली. तसेच उपजिल्हा रुग्णालय कामथे चिपळूणच्या जयश्री सुतार मॅडम (समुपदेशक) व अर्पिता कवडे मॅडम यांचे जागतिक एड्स विषयी व्याख्यान झाले. व विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. अरुणा सोमण मॅडम व एन. एस. एस.कार्यक्रम अधिकारी श्री. विक्रांत निवाते तसेच सर्व प्राध्यापक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

A

नेतृत्व प्रशिक्षण शिबिर सहभाग (२८/११/२०२५ ते ०२/१२/२०२५)

मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्ष आणि श्रीराम कुसुमताई सदाशिव वंजारे महाविद्यालय लांजा (कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय लांजा) यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्ह्याच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा या शैक्षणिक वर्षाचा नेतृत्व प्रशिक्षण शिबिर दिनांक २८ नोव्हेंबर ते ०२ डिसेंबर २०२५ या कालावधीमध्ये लांजा महाविद्यालयाच्या समोरील नाना नानी  शांती निवास या वृद्धाश्रमामध्ये आयोजित करण्यात आला होता.जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांच्या स्वयंसेवकांचा सहभाग यासाठी अनिवार्य होते. आपल्या श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलित, श्री.आनंदराव पवार महाविद्यालयातील विद्यार्थी कु.जंगम गुरुराज धीरज (एफ.वाय.बी.कॉम.), कु. कडव भक्ती सचिन (एफ.वाय.बी.कॉम.), कु. पोतदार दिव्यांगीनी दत्तात्रय (एफ.वाय.बी.एससी.) हे विद्यार्थी उपस्थित होते. तिथे त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आले. शारीरिक श्रम, मेहनत, कष्ट, शिस्त, या गोष्टी तिथे शिकायला मिळाल्या. तेथे  त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

A

श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे श्री. आनंदराव पवार महाविद्यालयाला चिपळूण हाफ मॅरेथॉन स्पर्धेत सुयश (दि. ३०/११/२०२५)

संघर्ष क्रीडा मंडळ, चिपळूण आयोजित आज झालेल्या चिपळूण हाफ मॅरेथॉन स्पर्धेत श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे श्री. आनंदराव पवार महाविद्यालयाच्या अनेक स्पर्धक विद्यार्थ्यानी सहभाग घेतला होता. त्यामध्ये खुला गटातून (पुरुष) ५ की.मी. मध्ये कु. स्वराज संदिप जोशी (प्रथम क्रमांक), कु. यश मंगेश शिर्के (तृतीय क्रमांक), कु. ओंकार अनंत चांदिवडे (चतुर्थ क्रमांक), कु. राज राजेश तांबे (पाचवा क्रमांक) प्राप्त केला असून १७ वर्षे शालेय गटातून ५ की.मी. मध्ये (मुलगे) कु. रूषप रविंद्र चव्हाण (पाचवा क्रमांक) आणि (मुली) कु. वेदिका विष्णू हरवडे  हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे उपस्थित मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते रोख रक्कम, सन्मान चिन्ह आणि भेटवस्तू देवून गौरविण्यात आले.

A

संविधान दिन (दि. २६/११/२०२५)

श्रीराम एज्युकेशन सोसायटी श्री.आनंदराव पवार महाविद्यालयामध्ये दिनांक 26 /11 /2025 रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला.

A

रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलन’ – दि. २२/११/२०२५

मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई व नवनिर्माण शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलनाचे’ औचित्य साधून युवकांसाठी स्वलिखीत काव्य वाचन आणि निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये आपल्या श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या श्री. आनंदराव पवार महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. वेदिका विष्णू हरवडे हिने युवारंग स्वलिखित काव्य वाचन स्पर्धेत १६ ते ३५ वर्षे वयोगटतून व्दितीय क्रमांक प्राप्त केलेला आहे तसेच कनिष्ठ महाविद्यालयीन गटातून निबंध स्पर्धेत कु. वैष्णवी गजानन हळदे हिने सुध्दा प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे.

A

दि. १८ ते १९/११/२०२५ रोजी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या यांच्या निर्देशान्वये तथा जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग मार्फत विभागस्तर शालेय कबड्डी (१९ वर्षाखालील मुली) क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेल्या स्पर्धेत आपल्या कनिष्ठ महाविद्यालयातील कु. गौरी नितिन कांबळी या विद्यार्थिनीची “राज्यस्तरीय शालेय कबड्डी निवड चाचणी ” साठी निवड

A

रत्नागिरी जिल्हास्तरीय युवा महोत्सव स्पर्धा – २०२५ (दि. २०/११/२०२५)

दि. २० नोव्हेंबर २०२५ रोजी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी आयोजित “रत्नागिरी जिल्हास्तरीय युवा महोत्सव स्पर्धा – २०२५” मध्ये जिल्हा क्रीडा संकुल, मारुती मंदिर रत्नागिरी येथे झालेल्या वत्कृत्व आणि कथालेखन स्पर्धेत श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या श्री. आनंदराव पवार महाविद्यालयाची इ. ११ वी सायन्स मधील विद्यार्थीनी कु. वेदिका विष्णू हरवडे हिला वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम  क्रमांक प्राप्त झालेला आहे  तसेच कु. वैष्णवी गजानन हळदे हीला सुध्दा कथालेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त झालेला आहे.

A

पंडित जवाहरलाल नेहरू जयंती (दि. १४/११/२०२५)

श्रीराम एज्युकेशन सोसायटी श्रीराम एज्युकेशन सोसायटी श्री आनंदराव पवार कनिष्ठ महाविद्यालयामध्ये दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालदिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाच्या प्राध्यापिका सौ राधिका वरपे मॅडम यांनी केली.महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ अरुणा सोमन मॅडम यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले व प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री मार्ग सर यांनी  पंडित जवाहरलाल नेहरू यांचे मुलं ही देवाघरची फुलं या वाक्याचा अर्थ सांगितला व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

अशा पद्धतीने श्री आनंदराव पवार महाविद्यालयांमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी करण्यात आली.

A

श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या श्री. आनंदराव पवार महाविद्यालयाचा कु. रितेश कलकुटकी या विद्यार्थ्याला जिल्हास्तरीय स्क्वॅश स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त आणि विभागीय स्पर्धेतही तृतीय क्रमांक प्राप्त (दि. १३/११/२०२५)

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय रत्नागिरी आयोजित जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये स्क्वॅश (१९ वर्षा खालील मुले) या क्रीडा प्रकारात आपल्या श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या श्री. आनंदराव पवार महाविद्यालयाचा इ. १२ वी सायन्स शाखेतील कु. रितेश कलकुटकी या विद्यार्थ्याने तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे आणि त्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड होऊन तृतीय क्रमांक प्राप्त झाला.

A

श्री. आनंदराव पवार महाविद्यालय चिपळूण कोंकण झोन आंतर महाविद्यालयीन खो-खो स्पर्धेत चतुर्थ क्रमांक प्राप्त (दि. ११/११/२०२५)

मुंबई विद्यापीठ आयोजित कोंकण झोन आंतर महाविद्यालयीन खो-खो स्पर्धेत श्री. आनंदराव पवार महाविद्यालय चिपळूण कोंकण झोन आंतर महाविद्यालयीन खो-खो स्पर्धेत चतुर्थ क्रमांक प्राप्त केला तसेच बीड येथे होणाऱ्या ६१ व्या राज्य अजिंक्य खो-खो स्पर्धेसाठी ओम प्रकाश पवार, अनुल अजित नाटेकर, दुर्वांश गणेश कातळकर, ओंकार जितेंद्र पवार, आदित्य अनिल अदावडे यांची रत्नागिरी जिल्हा संघात निवड.

A

मुंबई विद्यापीठ संघात निवड

श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या श्री. आनंदराव पवार महाविद्यालयाचा कु. स्वराज संदीप जोशी “मुंबई विद्यापीठ इंटर झोन अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद २०२५-२६” मध्ये १५०० मीटर धावणे स्पर्धेत  द्वितीय क्रमांक (सिल्व्हर मेडल) पटकावला आहे. त्याची मुंबई विद्यापीठ संघात निवड झाली.

A

रत्नागिरी जिल्हा संघामध्ये निवड

रविवार दिनांक १६ नोव्हेंबर २०२५ रोजी ओणी ता. राजापूर येथे झालेल्या रत्नागिरी जिल्हा खो-खो कुमार अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेमध्ये श्रीराम एज्युकेशन सोसायटी स्पोर्टस् अकॅडमी चिपळूण आणि श्री. आनंदराव पवार महाविद्यालय, चिपळूणचा विद्यार्थी कु. विराज निलेश निवाते (इयत्ता १२ वी) यांनी चमकदार कामगिरी करुन रत्नागिरी जिल्हा संघामध्ये स्थान प्राप्त केले आहे.

A

सामूहिक वंदे मातरम या गीताचे गायन (दि. ०७/११/२०२५)

श्रीराम एज्युकेशन सोसायटी श्री. आनंदराव पवार महाविद्यालय मध्ये दिनांक 7 नोव्हेंबर 2025 रोजी वंदे मातरम या सार्थ शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने  वंदे मातरम या राष्ट्रीय  गीताच्या रचनेला 150 वर्ष पूर्ण होत आहेत या ऐतिहासिक घटनेची औचित्य साधून सामूहिक वंदे मातरम या गीताचे गायन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी  शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

A

कु. यश मंगेश शिर्के “मुंबई विद्यापीठ इंटर कॉलेजिएट अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद २०२५ – कोकण विभाग IV” १० की.मी. धावणे स्पर्धेत  प्रथम

३१ ऑक्टोबर ते ०२ नोव्हेंबर २०२५ दरम्यान एस. व्ही. जे. सी. टी. क्रीडा संकुल, डेरवण ता.  चिपळूण  येथे चालू असलेल्या “मुंबई विद्यापीठ इंटर कॉलेजिएट अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद २०२५ – कोकण विभाग IV” मुलांमध्ये आज झालेल्या १० की.मी. धावणे या क्रीडा प्रकारात कु. यश मंगेश शिर्के याने प्रथम क्रमांक (गोल्ड मेडल) पटकावला आहे. त्याची इंटर झोन स्पर्धेसाठी निवड

A

राष्ट्रीय एकता दिवस (दि. ३१/१०/२०२५)

श्रीराम एज्युकेशन सोसायटी श्री आनंदराव पवार महाविद्यालय मध्ये शुक्रवार दि. 31 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 :30 वाजता सरदार वल्लभभाई पटेल यांचे 150 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय सेवा योजना (NSS)अंतर्गत राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला.त्यावेळी पदयात्रा व राष्ट्रीय एकता दिवस शपथ यांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे पीआरओ श्री. योगेश चौगुले सर, संस्थेचे रजिस्टर श्री. अजित खेडेकर सर तसेच एन.एस.एस.कार्यक्रम अधिकारी श्री. विक्रांत निवाते सर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

A

भारतरत्न डॉक्टर ए.पी.जे अब्दुल कलाम जयंती व वाचन प्रेरणा दिन (दि. १५/१०/२०२५)

श्रीराम एज्युकेशन सोसायटी श्री.आनंदराव पवार महाविद्यालय मध्ये दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ रोजी  भारतरत्न डॉक्टर ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाच्या प्राध्यापिका सौ. आरोही जाधव यांनी केले.   श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आनंदराव पवार महाविद्यालयाचे चेअरमन श्री.मल्लेश लकेश्री सर तसेच कार्यवाहक श्री.प्रशांत देवळेकर सर कोषाध्यक्ष श्री.सिद्धेश लाड सर तसेच संस्थेचे पी.आर.ओ. श्री.योगेश चोगले सर आणि महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ.अरुणा सोमण मॅडम यांनी दीप प्रज्वलन आणि प्रतिमेस पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी महाविद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महाविद्यालयाच्या प्राध्यापिका सौ . आरोही जाधव यांनी केले.अशा पद्धतीने महाविद्यालयामध्ये  भारतरत्न डॉक्टर ए.पी.जे अब्दुल कलाम व वाचन प्रेरणा दिन ही साजरा केला गेला.

A

श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या श्री. आनंदराव पवार महाविद्यालयाचा कु. निलेश शिंदे याची ऑल इंडिया कबड्डी स्पर्धेत निवड

०१ ते ०५ ऑक्टोबर २०२५ दरम्यान मेडिकॅप्स विद्यापीठ, ए.बी. रोड, पिगडंबर, राऊ, इंदौर येथे झालेल्या पश्चिम विभागीय आंतर- विद्यापीठ कबड्डी (पुरुष) स्पर्धेत कु. निलेश रविंद्र शिंदे याने मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले त्यात या संघाला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. त्यामुळे त्यांची ऑल इंडिया कबड्डी स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. यामुळे त्यांची गलगोटिया विद्यापीठ, ग्रेटर नोएडा, दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ कबड्डी (पुरुष) स्पर्धेत निवड करण्यात आली.

A

श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या श्री. आनंदराव पवार महाविद्यालयाचा कु. ऋतुराज रविंद्र हुमणे या विद्यार्थ्याने मुंबई विद्यापीठ इंटर कॉलेजिएट अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद २०२५ – कोकण विभाग IV” थाळी फेक स्पर्धेत तृतीय क्रमांक (ब्राँझ मेडल) पटकावला आहे

A

श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे श्री. आनंदराव पवार महाविद्यायाची कु. वैष्णवी गजानन हळदे हीला गाव विकास समिती, रत्नागिरी जिल्हा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “छत्रपती संभाजी महाराज जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत” उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त

ऑक्टोबर २०२५ मध्ये गाव विकास समिती, रत्नागिरी जिल्हा यांच्या वतीने आयोजित केलेल्या “छत्रपती संभाजी महाराज जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचा” निकाल नुकताच जाहीर झाला असून सदर स्पर्धेत” आपल्या श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या श्री. आनंदराव पवार महाविद्यालयाची इ. ११ वी वाणिज्य शाखेतील कु. वैष्णवी गजानन हळदे या विद्यार्थिनीने खुल्या गटातून उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला असून तीला येत्या काही दिवसांत मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. संस्थेचे सर्व वरीष्ठ पदाधिकारी, पी.आर.ओ, रजिस्ट्रार, महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राचार्या, सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने वैष्णवीचे खूप-खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा

A

कु. वेदिका विष्णू हरवडे हिला तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त (दि. ०२/१०/२०२५)

श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या श्री. आनंदराव पवार महाविद्यालयाची कु. वेदिका विष्णू हरवडे हीने वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून सुयश प्राप्त केले आहे. सदर स्पर्धा लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, चिपळूण यांच्या वतीने आयोजित केली होती. त्यामध्ये महाविद्यालयीन गटातून कु.  वेदिका विष्णू हरवडे हीने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.

A

जिल्हास्तरीय वक्तृत्व व निबंध स्पर्धेत सुयश – कु. वेदिका विष्णू हरवडे वक्तृत्व स्पर्धेत तृतीय तर वैष्णवी हळदे निबंध स्पर्धेत उत्तेजनार्थ (दि. ०२/१०/२०२५)

चिपळूण नगर परिषद चिपळूण आणि पूज्य गांधी प्रतिष्ठान चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय वक्तृत्व आणि निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, या स्पर्धेत जिल्ह्यातून अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये कनिष्ठ महाविद्यालयीन गटातून श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या श्री. आनंदराव पवार महाविद्यालयाची कु. वेदिका विष्णू हरवडे हिने वक्तृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त केला तर कु. वैष्णवी गजानन हळदे हिने निबंध स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांक मिळवून सुयश प्राप्त केले आहे. या दोघींना आज दि. ०२ ऑक्टोबर रोजी (म. गांधी जयंती जयंती) सकाळी ठीक ०९ वाजता गांधारेश्वर मंदिर शेजारी म. गांधी रक्षाकलश समोर मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस देवून गौरविण्यात आले.

A

महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती (दि. ०२/१०/२०२५)

श्रीराम एज्युकेशन सोसायटी श्री आनंदराव पवार महाविद्यालय मध्ये दिनांक 2 ऑक्टोबर २०२५ रोजी महात्मा गांधी व मा माजी प्रंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाच्या प्राध्यापक सौ. राधिका वर्पे यांनी केले.  संस्थेचे रजिस्टार श्री अजित खेडेकर सर आणि महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ अरुणा सोमण मॅडम यांनी दीप प्रज्वलन आणि प्रतिमेस पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी यावेळी महाविद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेचे रजिस्टर श्री खेडेकर सर यांनी महात्मा गांधीजींबद्दल आणि लालबहादुर शास्त्री यांच्या बद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महाविद्यालयाच्या प्राध्यापिका सौ राधिका वर्पे यांनी केले.अशा पद्धतीने महाविद्यालयामध्ये महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली.

A

स्वच्छता मोहीम (दि. २४/०९/२०२५)

श्री.आनंदराव पवार महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित ‘स्वच्छता ही सेवा मोहीम 2025′(SHS)अंतर्गत एक दिवस, एक तास, एक साथ स्वच्छता म्हणून राबविण्यात आले.यावेळी महाविद्यालयाच्या परिसरात स्वच्छता करण्यात आले.यावेळी स्वच्छता ही सेवा यावर जनजागृती करण्यात आली.

 यावेळी संस्थेचे पी.आर.ओ. श्री.योगेश चौगुले सर, रजिस्टार श्री.अजित खेडेकर सर, महाविद्यालयाच्या प्राचार्य सौ.अरुणा सोमन  मॅडम यांच्या विशेष मार्ग दर्शनाखाली उपरोक्त कार्यक्रमाचे प्रयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रम अधिकारी श्री.विक्रांत निवाते सर तसेच सर्व प्राध्यापक वर्ग,व एनएसएस स्वयंसेवक उपस्थित होते.

A

श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या श्री. आनंदराव पवार महाविद्यालयाला तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सुयश (दि. २४/०९/२०२५)

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय रत्नागिरी आयोजित तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये (१९ वर्षा खालील मुले/मुली) या क्रीडा प्रकारात आपल्या श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या श्री. आनंदराव पवार महाविद्यालयाचे विद्यार्थी कु. रूषप चव्हाण (३००० मीटर धावणे) व्दितीय क्रमांक, साईराज फागे (१५०० मीटर धावणे) तृतीय क्रमांक, हर्ष जाधव (८०० मीटर धावणे) तृतीय क्रमांक, आर्या चव्हाण (२०० मीटर धावणे) तृतीय क्रमांक प्राप्त केलेला आहे. तसेच कु. रूषप चव्हाण याची (३००० मीटर धावणे) जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.

A

कोकण झोन कबड्डी

२२ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर २०२५ दरम्यान डी.ए.व्ही. कॉलेज भांडुप आयोजित मरीन लाईन मुंबई येथे झालेल्या आंतर कबड्डी स्पर्धेत कोकण झोन कबड्डी मुलांच्या संघाने दुसरे आणि मुलींच्या कबड्डी संघाने तिसरे स्थान पटकावले आहे…. त्यामध्ये सहभागी विद्यार्थी कु. अमरसिंग कश्यप (कॅप्टन), कु. ओम शिर्के, कु. निलेश शिंदे, कु. रोशन चिपळूणकर, कु. प्राची बाधवणकर

A

महाविद्यालयाची कु. वेदिका विष्णू हरवडे हिला रोटरी क्लब ऑफ चिपळूण आयोजित आंतरविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त (दि. २०/०९/२०२५)

श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या श्री. आनंदराव पवार महाविद्यालयाची कु. वेदिका विष्णू हरवडे हीने रोटरी क्लब ऑफ चिपळूण आयोजित आंतरविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत (ग्रुप – क : ११ वी ते १२ वी) कनिष्ठ महाविद्यालयीन गटातून तृतीय क्रमांक मिळवून सुयश प्राप्त केले आहे. वेदिकाला मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र, सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात आले. सदर स्पर्धा आज दि. २० सप्टेंबर २०२५ रोजी एस.पी.एम. इंग्लिश मिडीयम स्कूल परशुराम, ता. चिपळूण येथे संपन्न झाली.

A

श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या श्री. आनंदराव पवार महाविद्यालयाचा कु. ओम गोसावी या विद्यार्थ्याला जिल्हास्तरीय वेटलिफ्टींग स्पर्धेत व्दितीय क्रमांक प्राप्त (दि. १९/०९/२०२५)

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय रत्नागिरी आयोजित जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये वेटलिफ्टींग (१७ वर्षा खालील मुले) या क्रीडा प्रकारात आपल्या श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या श्री. आनंदराव पवार महाविद्यालयाचा इ. ११ वी आर्ट्स शाखेतील कु. ओम गोसावी या विद्यार्थ्याने व्दितीय क्रमांक (सिल्व्हर मेडल) प्राप्त केला आहे त्याबद्दल संस्थेचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयांचे प्राचार्य, पी.आर.ओ., रजिस्ट्रार, सर्व प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने खूप-खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.

A

महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींचा जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक (दि. १९/०९/२०२५)

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय रत्नागिरी आयोजित जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये कबड्डी (१९ वर्षा खालील मुली) या क्रीडा प्रकारात आपल्या श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या श्री. आनंदराव पवार महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींनी (चिपळूण) फायनल मध्ये प्रवेश करुन गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (रत्नागिरी) विरुद्ध झालेल्या अटीतटीच्या सामन्यात प्रथम क्रमांक (विजेतेपद) प्राप्त केले आहे.

A

आरोग्य तपासणी (हिमोग्लोबिन) (दि. १५/०९/२०२५)

श्रीराम एज्युकेशन सोसायटी श्री.आनंदराव पवार महाविद्यालय चिपळूण येथे एनएसएस विभागातर्फे श्रमिक कृषी संवर्धन संस्था आणि स्वयंपूर्णता फाउंडेशन रत्नागिरी श्रीमद राजचंद्र हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर (SRHRC) धरमपूर, गुजरात यांच्या संयुक्त विद्यमाने अनिमिया नियंत्रण प्रकल्प, आरोग्य तपासणी (हिमोग्लोबिन ) दिनांक 15 /09 /2025 रोजी श्री.आनंदराव पवार महाविद्यालय मध्ये  राबवण्यात आले.

कोकण विभागातील स्त्री पुरुष व मुला मुलींमधील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्याने त्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. कुपोषण व अशक्तपणा जास्त प्रमाणात असल्याने संपूर्ण आरोग्यावर, शारीरिक व मानसिक क्षमता यावर हिमोग्लोबिनचा परिणाम होत आहे.

त्या अनुषंगाने हा उपक्रम आपल्या श्रीराम एज्युकेशन सोसायटी श्री.आनंदराव पवार महाविद्यालय  मध्ये राबविण्यात आला. त्यावेळी श्रमिक कृषी संवर्धन संस्थेचे अध्यक्ष श्री विलास डिके सर, तसेच संस्थेचे पीआरओ श्री. योगेश चौगुले सर, रजिस्टार श्री. अजित खेडेकर सर महाविद्यालयाच्या प्राचार्य सौ. अरुणा सोमन मॅडम,एनएसएस प्रमुख श्री.विक्रांत निवाते सर, तसेच महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

A

श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या श्री. आनंदराव पवार महाविद्यालयाची कु. खुशी जोगले या विद्यार्थीनीला जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त (दि. १०/०९/२०२५)

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय रत्नागिरी आयोजित जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये तायक्वांदो Taekwondo (१७ वर्षा खालील मुली) या क्रीडा प्रकारात आपल्या श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या श्री. आनंदराव पवार महाविद्यालयाची इ. ११ वी कला शाखेतील कु. खुशी जोगले या विद्यार्थीनीने तृतीय क्रमांक (ब्राँझ मेडल) प्राप्त केले आहे, त्याबद्दल संस्थेचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयांचे प्राचार्य, पी.आर.ओ., रजिस्ट्रार, सर्व प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने खूप-खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा

A

आरोग्य तपासणी शिबिर व सामान्य मानसिक आरोग्य कार्यशाळा सेमिनार (दिनांक: ०९ /०९ /२०२५)

श्री. आनंदराव पवार महाविद्यालयांमध्ये दिनांक 09/09/2025 आरोग्य तपासणी शिबिर व सामान्य मानसिक आरोग्य कार्यशाळा सेमिनार घेण्यात घेण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते आदरणीय अनुपमा पांडे व वानखेडे यांना आमंत्रित करण्यात आले होते.मानसिक आरोग्य ही प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. शारीरिक आरोग्याइतकेच मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर मानसिक आरोग्याविषयी योग्य माहिती, तणाव व्यवस्थापन, भावनिक संतुलन आणि सकारात्मक विचारसरणी विकसित व्हावी यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली. मानसिक आरोग्य चांगले असणे  ही काळाची गरज आहे.

 तसेच विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते.  डॉ. कीर्ती जोशी आणि त्यांची सहकारी फिजा गोलंदाज यांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य विषयी जागरूकता निर्माण  करणे तसेच विविध आजारांचे वेळेत निदान व्हावे हे मुख्य उद्दिष्ट होते.

A

रत्नागिरी जिल्हा ज्युनियर ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ आणि रत्नागिरी जिल्हा अंडर २३ ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप (दि. २४/०८/२०२५)

रत्नागिरी जिल्हा ज्युनियर ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ आणि रत्नागिरी जिल्हा अंडर २३ ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप ही स्पर्धा S.V.J.C.T. स्पोर्ट्स अकॅडमी, डेरवण येथे रविवार दि. २४ ऑगस्ट २०२५ रोजी आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये २० वर्षाखालील गटात ओम पवार याला १०० मीटर द्वितीय क्रमांक आणि ४०० मीटर द्वितीय क्रमांक प्राप्त तसेच १८ वर्षाखालील गटात विराज निवाते याला ४०० मीटर चतुर्थ क्रमांक प्राप्त ३९ वी महाराष्ट्र राज्य ज्युनियर ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ पुणे येथे २ ते ५ सप्टेंबर २०२५ दरम्यान होणार आहे. त्यासाठी ओम पवार याची निवड झाली आहे.

A

वृक्षारोपण (दि. २२/०८/२०२५)

श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलित श्री आनंदराव पवार महाविद्यालयामध्ये दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला .या कार्यक्रमांमध्ये श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आनंदराव पवार महाविद्यालयाचे चेअरमन श्री मल्लेश लकेश्री सर संस्थेचे (पी.आर.ओ )श्री योगेश चोगले सर, रजिस्टार श्री अजित खेडेकर सर तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ अरुणा सोमन मॅडम आणि शिक्षक  यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. एन.एस.एस कार्यकारी अधिकारी श्री विक्रांत निवाते सर व सर्व महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग व इतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट पर्यावरण संवर्धन, हरित क्षेत्र वाढविणे आणि विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जाणीव निर्माण करणे हे होते.

सुरुवातीस सर्वप्रथम पर्यावरण विषयावर थोडक्यात मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी तसेच उपस्थित पाहुण्यांनी एकत्र येऊन विविध औषधी, फुलझाडे व फळझाडे अश्या रोपांची लागवड केली.

सर्वांनी मिळून रोपांची योग्य देखभाल करण्याची जबाबदारी स्वीकारली. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी उत्साह दिसून आला. या कार्यक्रमामुळे “एक वृक्ष शंभर उपकार” या उक्तीचा प्रत्यक्ष अनुभव सर्वांना आला.

याच दिवशी एक राखी कृतज्ञतेसाठी या उद्देशाने महाविद्यालयात एन.एस.एस विभाग अंतर्गत चिपळूण नगरपालिकेतील सफाई कर्मचारी यांना राखी बांधून त्यांच्याशी एक संवाद साधला. अशाप्रकारे एक सामाजिक बांधिलकी जपली गेली.

A

लोकमान्य टिळक वाचनालयात विद्यार्थिनी वेदिका हरवडेला स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहणाचा मान (दि. १५/०८/२०२५)

चिपळूण (१२ ऑगस्ट) : श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलित श्री. आनंदराव पवार महाविद्यालय, चिपळूणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी घटना घडली आहे. महाविद्यालयातील इयत्ता अकरावी (सायन्स)ची विद्यार्थीनी कुमारी वेदिका विष्णू हरवडे हिला, स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरात ध्वजारोहण करण्याचा सन्मान लाभला.

वेदिकाने हा मान आपल्या वक्तृत्वकौशल्याच्या जोरावर पटकावला. १ ऑगस्ट रोजी आयोजित वक्तृत्व स्पर्धेत तिने प्रभावी आणि सशक्त मांडणी करत प्रथम क्रमांक मिळवला होता. या उल्लेखनीय यशाची दखल घेत वाचन मंदिर समितीने तिला स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण करण्याचा मान बहाल केला. या स्पर्धेसाठी प्रा. भालेकर यांनी विशेष मार्गदर्शन केले होते.

गोवळकोट येथील रहिवासी असलेली वेदिका हरवडे ही अत्यंत गुणी आणि जिद्दी विद्यार्थिनी आहे. प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणात सातत्य ठेवत हायस्कूलमध्ये दहावीला ८७.२० टक्के गुण मिळवत तिने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. वक्तृत्वकलेसोबतच तिला गायनाचीही विशेष आवड असून, ती विविध सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांत नेहमीच आघाडीवर असते.

वेदिकाच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुणा सोमण, प्राचार्य भाऊ कांबळे, सर्व शिक्षकवृंद, कर्मचारी तसेच संस्थेचे पदाधिकारी रजिस्ट्रार खेडेकर, पी.आर.ओ. चोगले यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले. श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उदय गांधी, मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लेश लकेश्री, खजिनदार सिद्धेश लाड यांनी समाधान व्यक्त करत, “वेदिकाचे यश हे संस्थेसाठी अभिमानाची बाब आहे”, असे गौरवोद्गार काढले.

A

आझादी का अमृत महोत्सव (दि. १३ ते १५/०८/२०२५)

श्री. आनंदराव पवार महाविद्यालयात १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत आझादी का अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमाचा प्रमुख उद्देश विद्यार्थ्यांमध्ये स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून देणे तसेच स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाची जाणीव करून देणे हा होता.

१३ ऑगस्ट रोजी कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेच्या कार्याध्यक्ष सौ सई वरवटकर मॅडम यांच्या हस्ते झाला त्यावेळी संस्थेचे पदाधिकारी संस्थेचे संचालक बांधकाम समिती प्रमुख श्री सुहास चव्हाण सर PRO श्री योगेश चौगुले सर रजिस्टार श्री अजित खेडेकर सर महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ अरुणा सोमण मॅडम शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. उद्घाटनावेळी प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या दिवशी देशभक्तीपर व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

१४ ऑगस्ट रोजी  श्री आनंदराव पवार महाविद्यालयांमध्ये संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा कॉलेज कमिटी अध्यक्ष श्री मल्लेश लकेश्री सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.तसेच संचालक बांधकाम समिती प्रमुख श्री सुहास चव्हाण सर PRO श्री योगेश चौगुले सर रजिस्टार श्री अजित खेडेकर सर परांजपे मोतीवाले हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री भाऊ कांबळे सर,महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ अरुणा सोमण मॅडम शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.  महाविद्यालयातर्फे भव्य दिव्य रॅलीचं आयोजन करण्यात आले.या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी घोषवाक्ये देत सामाजिक संदेश देणारे फलक हातात घेऊन मोठ्या उत्साहाने भाग घेतला. रॅलीतून स्वच्छता, सामाजिक जबाबदारी व राष्ट्रीय एकात्मतेचे संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आले.

१५ ऑगस्ट रोजी श्री आनंदराव पवार महाविद्यालयात भारताचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी ठीक सात वाजता सर्व मान्यवर शिक्षक व विद्यार्थी महाविद्यालयाच्या प्रांगणात एकत्र जमले. या दिवशी ध्वजारोहण संस्थेच्या उपाध्यक्ष श्रीमती कुंदा बापूसाहेब खेडेकर मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे पदाधिकारी अध्यक्ष श्री उदय गांधी सर तसेच उपाध्यक्ष श्री उल्हास पवार सर विश्वस्थ डॉक्टर मीनल ओक कार्यवाहक श्री प्रशांत देवळेकर सर कोषाध्यक्ष श्री सिद्धेश लाड सर तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच कॉलेज कमिटी अध्यक्ष श्री मल्लेश लके श्री सर PRO श्री योगेश चौगुले सर रजिस्टार श्री अजित खेडेकर सर परांजपे मोतीवाले हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री भाऊ कांबळे सर,महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ अरुणा सोमण मॅडम शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी संस्थेच्या उपाध्यक्ष श्रीमती कुंदा बापूसाहेब खेडेकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना  आपल्या भाषणातून स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची आठवण करून दिली आणि विद्यार्थ्यांना राष्ट्रनिर्मितीत सक्रिय योगदान देण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, नाटिका, नृत्य इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून वातावरण देशभक्तीमय केले.

संपूर्ण कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शिक्षकवृंद, आयोजन समिती आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. शेवटी आभारप्रदर्शनाने कार्यक्रमाचा समारोप झाला.

A

एस आर रंगनाथन जयंती (दि. १२ ऑगस्ट, २०२५)

A

सिलेंडर गॅस सुरक्षा माहिती बाबत सेमिनार (दि. ११/०८/२०२५)

श्री आनंदराव पवार महाविद्यालयांमध्ये  दिनांक ११/०८/२०२५ रोजी सूर्या गॅस कंपनीकडून गॅस सुरक्षा अभियान राबवण्यात आले. हा कार्यक्रम रासेयो अंतर्गत आयोजित करण्यात आला होता. दैनंदिन जीवनात घरगुती गॅस वापरापासून होणारे दुर्घटना आपण सर्वजणच पाहतो. परंतु त्यांचे योग्य मार्गदर्शन विद्यार्थ्यांना असणे गरजेचे आहे. त्यासाठी हे अभियान राबवण्यात आले होते. घरगुती गॅस वापरापासून होणाऱ्या दुर्घटना, गॅस टाकी पासून ते गॅस शेगडी पर्यंत होणारा गॅसगळती यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित वित्तहानी होते . याचे प्रशिक्षण यश दळवी आणि झहीर शेख यांनी केले. यश दळवी यांनी गॅस सुरक्षा विषयी माहिती सांगितली. तसेच जहीर शेख यांनी अशी दुर्घटना उद्भवली तर आपण काय केले पाहिजे याचे मोलाचे मार्गदर्शन केले. या वर्कशॉप साठी ,प्राचार्य सौ.अरुणा सोमण  सर्व शिक्षक वृंद,  विद्यार्थी व इतर कर्मचारी उपस्थित होते.

A

क्रांती दिन (दि. ०९/०८/२०२५)

श्रीराम एज्युकेशन सोसायटी श्री आनंदराव पवार महाविद्यालयामध्ये दिनांक 9 ऑगस्ट 2025 रोजी क्रांती दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलाने करण्यात आली. यावेळी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा कॉलेज कमिटी अध्यक्ष श्री मल्लेश लकेश्री सर तसेच संस्थेचे पी आर ओ श्री योगेश चौगुले सर आणि रजिस्टार श्री अजित खेडेकर सर आणि महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ.अरुणा सोमन मॅडम उपस्थित होते तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते श्री मल्लेश लकेश्री सर यांनी क्रांती दिना निमित्त आपले मनोगत व्यक्त केले व विद्यार्थ्यांना क्रांती दिनाचे महत्त्व समजावून सांगितले.

A

श्रीराम पावसाळी महोत्सव स्पर्धा व नवगतांचे स्वागत (२१ जुलै, २०२५)

श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे श्री.आनंदराव पवार महाविद्यालय खेंड  चिपळूण दिनांक 21 जुलै 2025 रोजी श्रीराम पावसाळी महोत्सव स्पर्धेला उत्साहात प्रारंभ करण्यात आला. या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे कार्यवाह श्री. प्रशांत देवळेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष उदय गांधी, कॉलेज कमिटी अध्यक्ष  मल्लेश लकेश्री, कोषाध्यक्ष श्री.सिद्धेश लाड, कार्यवाह श्री. प्रशांत देवळेकर, संचालक श्री. सुहास चव्हाण, तसेच संस्थेचे पीआरओ श्री.योगेश चौगुले रजिस्टार श्री. अजित खेडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य सौ.अरुणा सोमन व युवा सेना प्रमुख श्री. निहार कोवळे यांचे क्रीडा विद्यार्थी प्रतिनिधी तर्फे स्वागत करण्यात आले. तसेच रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आले. व नवगत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन एनएसएस विभाग,स्पोर्ट्स विभाग,आणि सांस्कृतिक विभाग यांनी केले होते.

A

गुरु पौर्णिमा (१०/०७/२०२५)

श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे, श्री. आनंदराव पवार महाविद्यालयात गुरु पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात   विद्यार्थी गुरुराज धीरज जंगम  याने  सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे सर्व नियोजन एन एस.एस विभागाकडून करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते आशिष सर मोकादम यांना आमंत्रित करण्यात आले होते

A

प्लास्टिक मुक्त चिपळूण शहर अभियान २०२५ सहभाग (दि. २०/०६/२०२५)

प्रांत कार्यालय, चिपळूण नगरपरिषद,चिपळूण प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिक मुक्त चिपळूण शहर अभियान २०२५ स्वच्छ सर्वेक्षण २०२५ व माझी  वसुंधरा अभियान ६.० अंतर्गत श्रीराम एज्युकेशन सोसायटी, श्री.आनंदराव पवार महाविद्यालय खेंड, चिपळूण यांनी चिपळूण नगर परिषद हद्दीमध्ये दि. २०/०६/२०२५ रोजी घेण्यात आलेला प्लास्टिक मुक्त चिपळूण शहर अभियानामध्ये सहभागी होऊन उत्कृष्ट कामगिरी केली. चिपळूण नगरपरिषद तर्फे प्लास्टिक मुक्त चिपळूण शहर अभियान राबविताना श्री. आनंदराव पवार महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जे उल्लेखनीय काम केले. त्याबद्दल श्री.आनंदराव पवार महाविद्यालय खेंड चिपळूणच्या विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

A

जागतिक योग दिन  (21/06/2025)